बी.सी.ए. भाग -१ मधील प्रवेश प्रक्रियेबाबत.....
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता BCA (बी.सी.ए. भाग -१) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी MAH- B.HMCT/BCA/BBA/BMS/BBM CET-2026 किंवा MAH-MHT CET 2026 (PCM/PCB Group ) सामाईक परीक्षा दिलेली आहे.... अशा सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर CET परीक्षेचा निकाल ११/०६/२०२६ रोजी जाहीर झालेला असुन बी.सी.ए. भाग -१ मधील प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या CAP (केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया ) साठी सर्व विद्यार्थ्यांनी आपली खालील कागदपत्रे उपलब्ध करून ठेवावीत. CAP साठी नावनोंदणी सुरु होताच तसे आपणास कळविण्यात येईल..... सदरची कागदपत्रे विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी येथे बी.सी.ए. विभागामध्ये घेऊन यावीत व आपली प्रवेशासाठी नावनोंदणी करावी......
CAP ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents)
खालीलपैकी १ ते ७ क्रमांकाची कागदपत्रे सर्वांनी घेवून यावीत......तर ८ ते १६ क्रमांकाची कागदपत्रे तुम्हास लागु होत असतील तरच घेवून यावीत....... सर्व कागदपत्रे ही मुळ (Original) स्वरूपातील आवश्यक आहेत.......तसेच सर्व कागदपत्रांची एक झेरॉक्स प्रत देखील सोबत घेऊन यावी.....
- SSC mark sheet (दहावी गुणपत्रक)
- HSC mark sheet (बारावी गुणपत्रक)
- Score Card Mark Sheet of CET examination (CET गुणपत्रक)
- School Leaving Certificate (१२ वी शाळा सोडलेचा दाखला)
- Adhar Card (आधार कार्ड)
- Domicile/Birth certificate ( रहिवाशी / जन्म दाखला)
- Bank passbook ( बॅंक खाते पुस्तक)
- Certificate stating that candidate belongs to the Maharashtra Karnataka border area in Proforma-G1. (सीमाभागात वास्तव्य असलेला दाखला)
- Caste/Tribe certificate (जात प्रमाणपत्र)
- Caste/Tribe validity certificate (जात वैधता प्रमाणपत्र)
- Non creamy layer certificate @ valid upto 31st March 2026. (OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक)
- Economically Weaker Section (EWS) certificate in Proforma V (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र)
- Orphan Certificate (अनाथ प्रमाणपत्र)
- Ex-Servicemen-Service Certificate (पालकांचे माजी सैनिक प्रमाणपत्र)
- Persons with Disability Candidates (अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
- Minority Community or Leaving Certificate (अल्पसंख्यांक प्रमाणपत्र)
टीप:
वरील कागदपत्रांची यादी ही गतवर्षीच्या परिपत्रकानुसार दिलेली आहे त्यामुळे नवीन परिपत्रकानुसार यामध्ये काही आणखी कागदपत्रांची आवश्यकता असल्यास तसे आपणास कळविण्यात येईल.
